सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 15 नवे रूग्ण, एकूण संख्या 416

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) गुरूवार 2 जुलै रोजी आणखी 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 416 इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आजवर 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आज एकजणांचा मृत्यू झाला
गुरूवारी एकूण 204 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 189 निगेटिव्ह आले तर 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 32 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 4238 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 4206 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 416 आहेत तर 3791 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गुरूवारी जे 15 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले यात बार्शी तालुक्यातील सहाजण असून यात बार्शी शहरातील भवानीपेठ 1, आदर्शनगर 1, सबजेल तहसील कार्यालय 1, वैराग 3. अक्कलकोट तालुक्यातील शहरात समर्थनगर व विजयनगर येथे प्रत्येकी एक, करजगी 1. दक्षिण सोलापूर तालुक्यात होटगी 1, हात्तुर 1, कुंभारी 1. करमाळा तालुक्यात खडकपुरा 1 व जिंती 1. मोहोळ तालुका वाळूज 1.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 416 रूग्ण आढळून आले असून यात 260 पुरूष व 156 स्त्रियांचा समावेश आहे.19 जणांनी प्राण गमावले असून यात 13 पुरूष व 6 स्त्रिया आहेत.सध्या रूग्णालयात 219 जणांवर उपचार सुरू असून आजवर 178 जणांनी कोरोनावर मात केली आहे व ते घरी गेले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!