सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 25 रूग्ण वाढले, बार्शी व अक्कलकोटमध्ये कोरोनाग्रस्तांचे शतक

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) सोमवार 6 जुलै रोजी आणखी 25 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 557 इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आजवर 26 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान बार्शीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 105 तर अक्कलकोटमध्ये 100 इतकी झाली आहे.
सोमवारी 129 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 104 निगेटिव्ह आले तर 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 35 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 4775 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 4740 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 556 आहेत तर 4184 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी जे 25 नवीन रूग्ण आढळून आले आहेत यात उत्तर सोलापूर तालुक्यात सात तिर्‍हे 2,पाकणी 2, हिरज 2, तळे हिप्परगे 1. पंढरपूर तालुका 4 यात शहरातील नवीपेठ 1, इसबावी सह्याद्रीनगर 1 तर करकंब 2. मोहोळ तालुक्यात 2 रूग्ण आज आढळले असून यात शहरातील बुधवार पेठ 1, टाकळी सिंकदर 1. दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन रूग्ण आज सापडले आहेत यात नवीन विडी घरकुल 1, वळसंग 1. करमाळा तालुक्यात जिंती येथे 2 रूग्ण आढळून आले आहेत. बार्शी तालुक्यात सहा रूग्ण नव्याने आज आढळले आहेत यात भवानीपेठ 1,इंदिरा नगर कासारवाडी रोड 1, सुतार नेट तानाजी चौक 1, फुले प्लॉट परांडा रोड 1, तालुक्यातील खांडवी 1, बाभुळगाव 1. अक्कलकोट तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत यात शहरातील भारत गल्लीत 1 तर तळेवाड 1.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 557 रूग्ण ( एक रूग्ण पुणे येथे पॉझिटिव्ह आहे.) आढळून आले आहेत. यापैकी 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 308 जणांवर उपचार सुरू असून 223 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. तालुकानिहाय एकूण रूग्ण अक्कलकोट 100, बार्शी 105, करमाळा 6, माढा 11, माळशिरस 6, मंगळवेढा 1, मोहोळ 28, उत्तर सोलापूर 59, पंढरपूूर 29, सांगोला 4, दक्षिण सोलापूर 208.
उपचार सुरू असणारे तालुका निहाय रूग्णः अक्कलकोट 62, बार्शी 72, करमाळा 6, माढा 4, माळशिरस 1, मंगळवेढा 1, मोहोळ 14, उत्तर सोलापूर 35, पंढरपूूर 22, सांगोला 1, दक्षिण सोलापूर 90.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!