स्वेरीत ‘अ स्टेप टूवर्डस् बिझनेस स्टार्टअप’ या विषयावरील वेबिनारला मोठा प्रतिसाद

पंढरपूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून ‘अ स्टेप टूवर्डस् बिझनेस स्टार्टअप’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार नुकताच संपन्न झाला.कार्यशाळेमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी अशा एकूण २६० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

जगभरातील यांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे असते. येत्या दशकामध्ये यंत्र निर्माण क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यामधील संशोधन आणि उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा वेबिनार विनाशुल्क आयोजित करण्यात आला होता. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक कार्यरत असतात.

या वेबिनारमध्ये यांत्रिकी अभियंता सूरज डोके यांनी ‘अ स्टेप टूवर्डस् बिझनेस स्टार्टअप’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. सदर ऑनलाईन वेबिनार हा १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत गुगल मीट ॲपद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. त्याचबरोबर वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्वांकडून सत्राच्या संबंधित ऑनलाईन प्रश्नावली देखील सोडविण्यात आल्या. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत अतिशय मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध केल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. एस.व्ही. कुलकर्णी, समन्वयक प्रा.ए.सी.वसेकर व प्रा. एस.एस.बागल यांच्या सह इतर प्राध्यापक वर्ग यांनीही परिश्रम घेतले .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!