स्वेरीत ‘इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल’ च्या पर्यावरण विषयक वेबिनारला मोठा प्रतिसाद

पंढरपूर– कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा आपल्या ज्ञानसाधनेत कुठेही खंड पडलेला नाही. एका बाजूला शैक्षणिक ज्ञानार्जनासाठी स्वेरीचे प्राध्यापक ऑनलाइन व्हिडिओज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सॉफ्ट कॉपी मधील नोट्स अशा विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेतच , त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी देखील विविध ऑनलाईन उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वेरीतील सिव्हिल इंजिनिअरींग विभाग व ‘इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (एनइइआरआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राजेश के. बिनीवाले यांचे गुगल मिट या अँप्लिकेशन च्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये स्वेरीच्या ‘इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल’ चे सदस्य अतुल मराठे, रमेश अडवी, सुदर्शन नातू हे ही उपस्थित होते. या वेबिनारला स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांनी घर बसल्या प्रचंड प्रतिसाद दिला.
स्वेरी विद्यार्थ्यांना विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहित करत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार तसेच डॉ. व्ही.एस.क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सदर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन दि. ५ जून २०२० रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० या कालावधीत करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बिनीवाले म्हणाले कि, ‘आज कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या लॉक डाऊनमुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी झाले आहे. सध्या जसे प्रदूषणमुक्त वातावरण आहे ते कायमस्वरूपी राहणे आवश्यक आहे त्या दृष्टीने आपल्याला भविष्यात प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन करणे हे देखील सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्या दृष्टीने भावी अभियंत्यांना निरंतर विकासासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ या वेबिनारच्या दरम्यान प्रश्नोत्तराचे छोटेसे सत्र देखील घेण्यात आले. त्या दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी व ‘इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल’ च्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. वेबिनारच्या शेवटी डॉ. व्ही.एस.क्षीरसागर यांनी डॉ.बिनीवाले व सर्व सहभागी मान्यवरांचे आभार मानले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!