हिरवाई ने नटले सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्य शिखर
माळशिरस: सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊंच शिखर म्हणून ओळखला जाणारा माळशिरस तालुक्यातील सुळकाईचा डोंगर सद्या लुसलुशीत गवताने अच्छादित होऊन निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिमेला सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पर्वतरांगेतील एका ऊंच टेकडी वर सुळकाईचे मंदिर वसले आहे. या टेकडीवर वसलेले मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे मीटरवर असून ते सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्च ठिकाण ठरले आहे. माळशिरस पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील गोरडवाडी शिवारातील व माळशिरस म्हसवडच्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्यामुळे हा परिसर पावसाळ्यात ओसाड वाटत होता, मात्र मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे हिरव्यागार गवताने व्यापलेला आहे. परतीच्या पावसामुळे सद्या हा परिसर बहरला असून माळशिरस म्हसवड रस्त्यावरून प्रवास करणऱ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
मूळ गारवाड येथे जन्मलेले व ब्रिटिश काळात जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहराचे अकरा वर्षे नगराध्यक्ष पद भूषविलेले कै.कॅप्टन मल्हारी चिकटे यांनी बांधलेल्या या छोट्या मंदिराचे जीर्णोद्धार २००५ साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे ठिकाण सुमारे पन्नास चौरस फूट जागेवर टोकदार सुळकी व पिरॅमिडच्या आकाराचे असल्यामुळे ते नजरेत भरते. या ठिकाणावरून चारही बाजूने अवलोकन केल्यास विहंगम दृश्य दिसते. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या शेती, शेततळे व नैसर्गिक तलाव निसर्गावलोकन करणाऱ्यांना मोहात टाकतात. पावसाळ्यात पडलेल्या पावसामुळे हिरवाई ने बहरलेला हा परिसर व हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्यामुळे अतिशय विलक्षण वाटतो.
भटकंतीचे आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींना हे ठिकाण एक दिवसाच्या निसर्ग भ्रमंतीला अतिशय मनोहारी आहे. या दिवसांत या परिसरातील कीटक, सरपटणाऱ्या प्राणी व ससे या भक्ष्यांना लक्ष्य करणारे शिकारी पक्ष्यांची गर्दी वाढते त्यामुळे पक्षीनिरीक्षकांना हे ठिकाण पर्वणीचे ठरते.
-डाॅ. अरविंद कुंभार
पक्षी व पर्यावरण अभ्यासक.
Hey there just wanted to give you a quick heads up. The text in your post seem to be running off the screen in Ie. I’m not sure if this is a formatting issue or something to do with internet browser compatibility but I figured I’d post to let you know. The design and style look great though! Hope you get the issue solved soon. Thanks