ग्रामीण भागातील जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील – प्रांतधिकारी सचिन ढोले
पंढरपूर २६– कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत ग्रामीण भागातील जीवनाश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील. याबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
ग्रामीण भागातील जीवनाश्यक सेवा सुरळीत रहाव्यात यासाठी पंढरपूर येथील व्यापाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, पोलीस अरुण पवार, कृषी उत्पन्न बाजास समितीचे सचिव कुमार घोडके तसेच शहरातील घाऊक विक्रेते उपस्थित होते.
यावेळी प्रांतधिकारी ढोले बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी विक्रीसाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी पंढरपूरमध्ये न येता. घाऊक विक्रेत्यांना मालाची यादी द्यावी. घाऊक विक्रेत्यांनी त्यांच्या यादीनुसार माल संबंधित ठिकाणी पोहोच करावा. ग्रामीण भागातील यासाठी त्यांना लागणारे पास पोलीस विभागाकडून देण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामस्तरीय समितीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसिलदारांच्या संपर्कात राहुन जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा होण्याबाबत योग्य नियोजन करावे. यासाठी कोणत्याही विक्रेत्यांनी पंढरपूर शहरामध्ये गर्दी करु नये.
तसेच ग्रामीण भागातील कोणत्याही खासगी वैद्यकीय सुविधा बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची क्षमता वाढविण्यात आली असून, आज अखेर पंढरपूर मध्ये कोणत्याही कोरोना संसर्गजन्य रुग्ण आढळलेला नाही परंतु नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले, संचार बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरात येणारा ग्रामीण भागातील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर येथे येणार त्या ठिकाणीच लिलाव होणार आहे., शहरातील भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेन विविध ठिकाणी ठरवून दिलेल्या जागेवरती बसावे. यासाठी भाजीपाल्याच्या वाहनांना पोलीस विभागाकडून पास देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर. विक्रेत्यांना नगपालिकेकडून पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी अतिउत्साही पणा दाखवून बाहेर फिरू नये, सुरक्षितता बाळगून घरी रहावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले आहे.