घरगुती वीज बील माफीसाठी मनसेचे आंदोलन, अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला पुष्पहार

पंढरपूर – घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली असून याचे पदसाद पंढरपुरात ही उमटले. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.
कोरोना काळातील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी तगादा सुरू केला आहे. यातच उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरा अन्यथा वीज तोडणीच्या कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट केले होते. यानंतर आता वीज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून आंदोलन केले.
निवेदन घेण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर उपस्थित अश्य अधिकार्‍याने निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे, शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी, शुभम धोत्रे, प्रथमेश धुमाळ यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!