चिंताजनक , काळजी घ्या : बुधवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 115 कोरोनाबाधित आढळले

पंढरपूर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचे चित्र असून बुधवार 10 मार्च रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 115 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये बुधवारी सर्वाधिक रूग्ण माळशिरस तालुक्यात 30 तर यापाठोपाठ पंढरपूर 20, बार्शीत 16, ,करमाळा 14 तर मोहोळमध्ये 12 जणांची नोंद आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज जिल्हा ग्रामीणच्या कोरोनाबाधितांच्या आकड्याने शतकपार केले आहे. जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 228 रूग्ण आजवर आढळून आले असून 1194 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 671 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 363 जण या आजारातून बरे झाले आहेत. आज ग्रामीणमध्ये 61 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले असून बुधवारी शहरात 6 तर ग्रामीणमध्ये 14 जणांनी नोंद आहे. आजवर या तालुक्यात 8295 रूग्ण आढळून आले असून 243 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 86 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7966 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!