नवव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे २१ व २२ डिसेंबरला जुहू येथे आयोजन
विठ्ठल पाटील यांची माहिती ; ऑनलाइन पाहता येणार सत्र
पंढरपूर : नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ व २२ डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील जुहू येथे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष पंढरपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर हे संमेलन अध्यक्ष असतील , अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.
संत साहित्याची माहिती सर्वांना सोप्या भाषेत समजावी यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील हे दरवर्षी संत साहित्य संमेलन घेतात. यंदा हे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जुहू येथे होणार आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ बच्चन यांनी स्वत: गायलेल पसायदानाचे ऐकवल जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ५० वारकरी महारज मंडळी उपस्थित राहून संत साहित्याची माहिती सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहेत. पहिल्यांदाच हे संत साहित्य संमेलन आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. त्या माध्यमातून थेट संमेलनातील सत्र तसेच संत साहित्याची माहिती ऐकता येणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिलीे.
पंढरपुरातील महाराज मंडळींचा सहभाग
पंढरपुरातील ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ह.भ.प. हरिदास महाराज बोराटे, ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास हे महाराज मंडळी या संत साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत.