सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 3160 जण कोरोनामुक्त तर 2235 जणांवर उपचार सुरू

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी 9 ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार अकरा तालुक्यांमध्ये 371 रूग्ण वाढले आहेत तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आज ही सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 115 आढळून आले आहे. गेले चार दिवस पंढरपूर कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 557 इतकी झाली असून यापैकी 3160 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2235 जणांवर उपचार सुरू आहेत. आज ही 117 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

तालुकानिहाय कोरोनावर मात करून घरी गेलेल रूग्ण व उपचार सुरू असणारे कंसात – अक्कलकोट 433 (92), बार्शी 752 (348), करमाळा 91 (143), माढा 159 (243), माळशिरस 152 (265), मंगळवेढा 91 (97), मोहोळ 151 (185), उत्तर सोलापूर 256 (126), पंढरपूर 431 (506), सांगोला 86 (88) तर दक्षिण सोलापूर 558 (412).

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 557 इतकी असून आजवर 162 जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. सध्या 2 हजार 235 जणांवर उपचार सुरू असून 3160 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. आज 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून यात अक्कलकोट 2, बार्शी 1, मोहोळ 1,उत्तर सोलापूर 2 तर पंढरपूर 2 व दक्षिण सोलापूर तालुका 1. रविवारी उपचारानंतर 117 जणांना घरी सोडण्यात आले. आज 3221 चाचण्या झाल्या यात 2850 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 371 पॉझिटिव्ह आहेत.

रविवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे व कंसात आजवरचे एकूण रूग्ण – अक्कलकोट 9 (551), बार्शी 52 (1148), करमाळा 20 (237), माढा 35 (411), माळशिरस 32 (422), मंगळवेढा 13 (190), मोहोळ 10 (347), उत्तर सोलापूर 36 (399), पंढरपूर 95 (961), सांगोला 15 (176) तर दक्षिण सोलापूर 54 (715).

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!