सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 159 रुग्णांची भर , 101 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 6 नोव्हेंबर रोजी एकूण 159 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 39 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 101 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 7 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31951 इतकी झाली असून यापैकी 29179 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1824 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 101 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 948 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 6 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 39 रूग्ण वाढले

पंढरपूर- शुक्रवारी 6 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 4 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 35 असे 39 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 380 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 191 झाली आहे. सध्या एकूण 500 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5689 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!