पंढरपूर – शनिवारी 20 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 176 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून 2 जणाचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात 3421 चाचण्या झाल्या असून यापैकी 3245 निगेटिव्ह तर 176 पॉझिटिव्ह आहेत. आज 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये माढा व बार्शी तालुक्यात प्रत्येकी 32 तर पंढरपूर तालुक्यात 28 , करमाळा 27 तर माळशिरस तालुक्यात 21 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये एकूण 42 हजार 465 रूग्ण आढळून आले असून यापैकी 1207 जणांचा मृत्यू झाला आहे. 39 हजार 944 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1314 जणांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीणमध्ये आजवर सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8470 आढळून आले असून 245 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 8044 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 181 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 28 रूग्ण आढळले असून यात शहरात 23 तर तालुक्यात 5 जणांची नोंद आहे.