सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्ष परीक्षांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

या नियमानुसार व सूचनांनुसार परीक्षा होतील

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर* *अंतिम वर्ष परीक्षा, एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थी परीक्षा-2019-20* Online Exams/offline exam (परीक्षा कालावधी 5 ते 29 ऑक्टोबर 2020)

* कोरोना महामारी संकटकाळात ऑनलाइन परीक्षा घेणे अतिशय सोपे, सरळ आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षेचे राहणार आहे.

* विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची व्यावसायिक आणि पारंपरिक या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असणार आहे.

* व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न ओपन होईल.

* पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एका शीट नंतर दुसरी शीट ओपन होईल. पहिल्या शिट्समधील प्रश्न सोडवल्यानंतर दुसऱ्या शीटमधील प्रश्न सोडवता येईल. सोडवलेला प्रश्न अथवा शीट परत ओपन होणार नाही, याची नोंद घ्यावी.

* दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये एटी-केटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी 35 प्रश्न व नियमित विद्यार्थ्यांसाठी 50 प्रश्न सोडवायचे आहेत.

* दोन्ही परीक्षांचा कालावधी 1 तास 30 मिनिटे असला तरी तांत्रिक अडचणींची शक्यता लक्षात घेता परीक्षा लिंक पाच तासांसाठी खुली राहणार आहे. मात्र एक पेपरचा कालावधी 1 तास 30 मिनिटे इतकाच राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे.

* कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घर बसल्या ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. मोबाईल अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईल. अपवादात्मक परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्‍य नाही, अशांसाठी ऑफलाइनची व्यवस्था असेल. त्यांनाही दीड तासातच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठीही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑनलाइन प्रमाणेच राहणार आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी. ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही अशांनी आतापासूनच तयारी केल्यास ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही.

* ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने परीक्षा पद्धत राहणार आहे.

* परीक्षा देऊन मिळालेल्या डिग्रीचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. आरोग्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अंतिम वर्ष, एटीकेटी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
सोलापूर, दि. 10-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्ष परीक्षा, एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आले आहेत त्यानुसार परीक्षा होतील असे कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. घरी राहूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अगदी सोप्या पद्धतीने देता येईल असे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. कोरोना महामारी संकटकाळात ऑनलाइन परीक्षा घेणे अतिशय सोपे, सरळ आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षेचे राहणार आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची व्यावसायिक आणि पारंपरिक या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न ओपन होईल. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एका शीट नंतर दुसरी शीट ओपन होईल. पहिल्या शिट्समधील प्रश्न सोडवल्यानंतर दुसऱ्या शीटमधील प्रश्न सोडवता येईल. सोडवलेला प्रश्न अथवा शीट परत ओपन होणार नाही, याची नोंद घ्यावी. दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये एटी-केटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी 35 प्रश्न व नियमित विद्यार्थ्यांसाठी 50 प्रश्न सोडवायचे आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी 1 तास 30 मिनिटे असला तरी तांत्रिक अडचणींची शक्यता लक्षात घेता परीक्षा लिंक पाच तासांसाठी खुली राहणार आहे. मात्र एक पेपरचा कालावधी 1 तास 30 मिनिटे इतकाच राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे.
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घर बसल्या ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. मोबाईल अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईल. अपवादात्मक परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्‍य नाही, अशांसाठी ऑफलाइनची व्यवस्था असेल. त्यांनाही दीड तासातच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठीही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑनलाइन प्रमाणेच राहणार आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी.
ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही अशांनी आतापासूनच तयारी केल्यास ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने परीक्षा पद्धत राहणार आहे. परीक्षा देऊन मिळालेल्या डिग्रीचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. आरोग्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!