सोलापूर शहरातील तीन तर ग्रामीणमधील 16 केंद्रांवर विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षेचे नियोजन

सोलापूर, दि.2- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्ष, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करण्यात आली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ऑफलाइनची परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर तर ग्रामीण मधील 16 केंद्रांवर होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांची सोय संगमेश्वर महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय आणि डी.बी. एफ. दयानंद महाविद्यालय येथील केंद्रांवर करण्यात आलेली आहे. तर ग्रामीण भागातील शिवाजी महाविद्यालय बार्शी, सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग, सी बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, सांगोला महाविद्यालय सांगोला, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, के एन भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, मारुतीराव महाडिक महाविद्यालय मोडनिंब, माऊली महाविद्यालय, वडाळा या 16 केंद्रांवर ऑफलाईन विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

*परीक्षा केंद्रांची माहिती संकेतस्थळावर*

कोणत्या परीक्षा केंद्रांवर कोणकोणत्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटरवर उपलब्ध असून संबंधित प्राचार्यांकडेही ती माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ऑफलाइन ऑप्शन निवडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*ऑनलाइन परीक्षा देता येईल*

परीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र भरून दिले नाही अथवा ऑफलाईन परीक्षा देण्यास संमती दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. यासाठी अशा विद्यार्थ्यांना www.pahsu.org या पोर्टल वर जाऊन तिथे आपला PRN नंबर टाकून forgot password हा पर्याय निवडायचा आहे. त्यांना मोबाईलवर पासवर्ड प्राप्त होईल. त्यानुसार त्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ऑफलाइन परीक्षा केंद्रां अंतर्गत महाविद्यालयांची यादी

*1) शिवाजी महाविद्यालय बार्शी:-* शिवाजी महाविद्यालय बार्शी, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय बार्शी, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, राजश्री शाहू विधी कॉलेज, बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी, स्वामी समर्थ बीएड कॉलेज बार्शी.

*2) सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट:-* सी बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट.

*3) माऊली महाविद्यालय वडाळा:-* माऊली महाविद्यालय वडाळा, लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय वडाळा.

*4) मारुतीराव महाडिक महाविद्यालय मोडनिंब:-* मारुतीराव महाडिक महाविद्यालय मोडनिंब.

*5) विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी:-* विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी.

*6) के. एन. भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी:-* के. एन. भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज माढा.

*7) सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते:-* सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, समीर गांधी कला महाविद्यालय माळशिरस, श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पानीव.

*8) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज:-* शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर, ग्रीनफिंगर कॉलेज अकलुज, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय अकलूज, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकलूज.

*9) भारत महाविद्यालय जेऊर:- *भारत महाविद्यालय जेऊर.

*10) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा:-* यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय करमाळा.

*11) संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा:-* संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा.

*12) बाबुराव पाटील महाविद्यालय अनगर:-* बाबुराव पाटील महाविद्यालय अनगर.

*13) देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ:-* देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ.

*14) सांगोला महाविद्यालय सांगोला:-* सांगोला महाविद्यालय सांगोला, विज्ञान महाविद्यालय सांगोला, महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय सांगोला, फॅबटेक महाविद्यालय सांगोला.

*15) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर:-* उमा महाविद्यालय पंढरपूर, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे, यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय भोसे, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे, इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव.

*16) स्वर्णलता गांधी महाविद्यालय वैराग:-* हेमूजी चंदेले महाविद्यालय शेळगाव, अभियांत्रिकी महाविद्यालय वैराग.

*17) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर:-* बी एम आय टी, कॉलेज ऑफ फार्मसी, शिवाजी नाईट कॉलेज, के पी मंगळवेढेकर कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, संगमेश्वर नाईट कॉलेज, शरदचंद्र पवार महाविद्यालय सोलापूर.

*18) वसुंधरा महाविद्यालय सोलापूर:-* सोनी कॉलेज, वसुंधरा महाविद्यालय, व्ही. जी. शिवदारे कॉलेज, सुशीलकुमार शिंदे महाविद्यालय सोलापूर.

*19) डी. बी. एफ दयानंद महाविद्यालय सोलापूर:-* ए आर बुर्ला महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज, डी.बी. एफ.दयानंद कॉलेज, दयानंद विधी महाविद्यालय, हिराचंद नेमचंद महाविद्यालय, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सिंहगड कॉलेज, ऑर्किड कॉलेज, सोशल कॉलेज, सोशल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसव्हीसीएस कॉलेज, यू. एस. महिला महाविद्यालय, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.

अंतिम वर्ष परीक्षा : सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर

सोलापूर, दि.3– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑक्टोबर 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसंबंधी काही अडचण असल्यास विद्यार्थी, पालकांनी त्या क्रमांकावर संवाद साधून आपले शंकेचे निरसन करू शकतात, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

अंतिम वर्ष, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसून मोबाईल, लॅपटॉप, संगणकाद्वारे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यापीठाकडून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल बनवण्यात आले आहे. www.pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांना काही अडचणी व समस्या असल्यास श्री गुंडू- 9623412484, श्री अलदार- 8275894911, श्री स्वामी- 8983930703, श्री देशमुख- 9767198594, श्री टिक्के- 8010093831, श्री पांढरे- 8010462681 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.

*प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटी-केटी परीक्षा नंतर*

सध्या 5 ऑक्टोबर पासून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. याबरोबरच पारंपारिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 3,4,5,6 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 5,6,7,8 तसेच पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या 7,8,9,10 या सत्रांच्या बॅकलॉगच्या देखील परीक्षा होणार आहेत. पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून सुरू होतील. उर्वरित विद्यार्थ्यांच्या एटी-केटी परीक्षा 25 ऑक्टोंबर नंतर व नोव्हेंबर महिन्यात होतील. विद्यापीठाकडून संकेस्थळावर यासंबंधीचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. तरी यासंबंधी काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!