केंद्र सरकारने ३ महिन्यात महाराष्ट्राला २८ हजार कोटी ₹ दिले : फडणवीस
मुंबई– मागील तीन महिन्यात केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार १०४ कोटी रुपये दिले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. यात
*गहू : 1750 कोटी रूपये
*तांदूळ : 2620 कोटी रूपये
*डाळ : 100 कोटी रूपये
*स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये
*असे एकूण : 4592 कोटी रूपये
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्राकडून आले.
उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडरसाठी 1625 कोटी रूपये , 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रू, बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रू. , एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रू.आणि आरोग्यासाठी 448 कोटी रू. राज्याला मिळाले आहेत.
डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये केंद्राने राज्याला दिले.
*शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी*
*कापूस : 5647 कोटी रू.
*धान : 2311 कोटी रू.
*तूर : 593 कोटी रू.
*चणा/मका : 125 कोटी रू.
*तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये.
*हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत*
*महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत*
*महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार.
*प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31*
*पीपीई किटस : 9.88 लाख
*एन 95 मास्क : 15.59 लाख
*आरोग्यासाठी मदत : 468 कोटी
केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील.
जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.