सोलापूर शहरात बुधवारी 45 रुग्ण वाढले, 68 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर – बुधवार 2 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात 45 कोरोना रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या ही 6757 इतकी झाली आहे. आज 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे आजवर 5576 जण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 761 जणांवर उपचार सुरु आहेत. आजवर या आजाराने 420 जणांनी प्राण गमावले आहेत. आज 3 जण मरण पावले आहेत. बुधवारी 406 अहवाल मिळाले यापैकी 361 निगेटिव्ह तर 45 पाँझिटिव्ह आहेत. प्रलंबित अहवाल 196 आहेत.