मंगळवेढा तालुक्यातील बोराळे रस्त्यावरील लिंगरा ओढ्यावरील पूल दुरुस्त करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

मंगळवेढा – सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बोराळे रोडवरील खराब झालेला लिंगरा ओढ्याचा पूल दुरुस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रत्येक पावसाळ्याच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते, संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी ,सामान्य नागरिक यांच्याकडून दरवर्षी ही मागणी केली जाते, परंतु तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभाग डागडुजी करते. मागील काही दिवसापासून मंगळवेढा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आणखी मोठा पाऊस झाल्यास बोराळे गावापासून लगतच्या आरळी तांडोर, सिद्धापूर या गावातील ओढ्याला पाणी येते. अशावेळी माचणूर ,बेगमपूर व अन्य ठिकाणाहून येथील ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. हे टाळण्यासाठी या लिंगरा ओढ्यावरील पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. लवकरात लवकर याचे काम करावे याबाबतचे निवेदन देण्यात आले.यावर तालुकाध्यक्ष भारत बेदरे, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर सोमगोंडे, उपाध्यक्ष रामेश्वर सगेलकर शिवाजी काळे, राजेंद्र अमुगे यांच्या सह्या आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!