श्री गणेश आगमनादिवशी समृद्धी ट्रॅक्टरमधून एकाचवेळी २१ शेतकऱ्यांनी खरेदी केले सोनालिका ट्रॅक्टर

तिघांना मिळाला लकी ड्रॉ विजेत्याचा मान;भव्य रॅली काढून लकी ड्रॉचे वितरण

पंढरपूर- श्रीगणेश आगमनाच्या दिवशीच गणपती बाप्पांच्यासोबतच पंढरपूर तालुक्यातील डिव्हीपी उद्योग समूहाच्या समृद्धी ट्रॅक्टर्समधून तब्बल २१ शेतकऱ्यांनी २१ सोनलिका ट्रॅक्टर्सची खरेदी केली.

भव्य रॅली काढून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात आले. तसेच प्रत्येकी दहा ग्राहकांचा लकी ड्रॉ घेण्यात आला होता. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम व सवलती राबविणाऱ्या समृद्धी ट्रॅक्टर्सच्यावतीने यावेळी लकी ड्रॉ काढून तीन भाग्यवान विजेत्यांना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते याचे करण्यात आले. विजेते श्री.महेश बळीराम कोरके २१००० रुपये, द्वितीय विजेते श्री.मारूती दादासो  भोसे १५००० व तिसरे विजेते श्री.रणजीत नंदकुमार बागल यांना ७००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.पंढरपूर तालुक्यातील समृद्धी ट्रॅक्टर्स ही सोनलिका ट्रॅक्टर्सची राज्यातील प्रमुख शाखा असून देशात द्वितीय क्रमांकाच्या व राज्यात प्रथम क्रमांकाचा विक्रीचा मान सध्या समृद्धी ट्रॅक्टरने मिळविला आहे.

पंढरपूरचे युवा नेते व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्सच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. बाप्पांच्या आगमनाला २१ शेतकऱ्यांनी सोनलिका ट्रॅक्टर खरेदी करून सोनलिकाला आपली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे.त्यामधून शेतकरी सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचावेल. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासत अभिजीत पाटील  यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते केले असल्याने दिसून येते. त्याच बरोबर लकी ड्रॉची सवलत ही एक महिना वाढविण्यात आल्याने अजून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी ग्राहक, शेतकऱ्यांसह सोनालिका ट्रॅक्टरचे साहील शिंगला सर, सुरेंद्रसिंग ठाकूर सर, समृद्धी ट्रॅक्टर्सचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, पोरे, समृद्धी ट्रॅक्टर्स सेल्समन उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!