चोवीस तासात उजनी अकरा टक्के वधारली, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम

पंढरपूर- मागील दोन दिवसांपासून भीमा खोर्‍यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक शनिवार २४ जुलै रोजी सकाळी ५७ हजार क्युसेक ईतकी होती. धरण चोवीस तासात जवळपास अकरा टक्के वधारले आहे. सकाळी सह वाजता ते १२.७९ टक्के उपयुक्त स्थितीत होते.
नीरा नदी परिसरात होत असलेल्या पावसाने रात्री वीरचे दरवाजे उघडून ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर काल सायंकाळपासून वीज निर्मिती साठी ८०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. पहाटे हा विसर्ग २१ हजार क्युसेक करण्यात आल्याने आता नीरा व भीमा नदी भरून वाहणार आहेत.
भी्मा व नीरा खोर्‍यात मुसळधार पावसाची आजही नोंद असून अनेक धरण परिसरात तसेच भीमेच्या उपनद्यांच्या पर्जन्यक्षेत्रात दोनशे मिलिमीटरहून अधिक पाऊस आहे. दरम्यान खडकवासला धरणातूनही २० हजार क्युसेक ने पहाटे पाणी सोडले जात होते. यामुळे उजनीत दौंडजवळून येणार्‍या पाण्याचा विसर्ग ही आता ५७ हजार ७५४ क्युसेक असून हा महाकाय प्रकल्प २४ तासात अकरा टक्के वधारला आहे. दौंडमधून येणारी पाण्याची आवक व पुणे बंडगार्डन विसर्ग पाहता उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारणार आहे.
मागील चोवीस तासात भीमा खोर्‍यातील तसेच भीमा नदीच्या परिसरात होत असलेला पाऊस, इंद्रायणी नदीतून येणारे पाणी यामुळे दौंडचा विसर्ग वाढत आहे.
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 24/07/2021 at 6.00 hrs
RWL —— 491.970 m.
Water Sp.Area —215.42
Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1996.86 M Cum.
——– (70.51 TMC)
Live ——– 194.05 M Cum.
——— ( 6.85 TMC)
Live % ——– *12.79 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 01/247 mm.
Evaporation ——– 3.02 mm.
*River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 501.120 m.
Inflow Discharge – 52754 Cusecs.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!