मतदारसंघात रस्ते विकासासाठी १४३ कोटी रुपयांची नितीन गडकरी यांच्याकडे आ. आवताडे यांनी केली मागणी

मंगळवेढा– पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये परिवर्तनाची नांदी देत भाजपाचे समाधान आवताडे हे आमदार झाले यावेळी मतदारसंघातील जनतेला विकासासाठी दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी त्यांनी आता काम सुरु केले आहे. नवी दिल्ली दरबारी पोहोचून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली व विविध मागण्या मांडल्या.
मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी सी. आर. एफ. फंडामधून रस्ते विकसित करण्यासाठी तब्ब्ल १४३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवेढा बाह्यवळण रस्ता सोलापूर जिल्हा प्रादेशिक विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम – १९६६ चे कलम १५ (१) अन्वये सन २००५ साली मंजूर झालेला आहे. सोलापूर जिल्हा प्रादेशिक विकास योजना अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद परिघस्त परिसर क्षेत्रातील मंगळवेढा – पंढरपूर राज्य महामार्गपासून ते जुना मारापूर रस्ता व अकोला रस्ता मार्गे रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग ( मंगळवेढा – सांगोला) पर्यंतच्या रस्त्यास ३० मीटरचा बाह्यवळण रुंदीचा जोडणारा रस्ता मंजूर असून त्याचे भूसंपादन करून त्वरित विकसित करावा अशी मागणी प्रत्यक्ष भेट घेऊन नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
तसेच माचणूर तीर्थक्षेत्र असल्याने व तेथील भक्तांची आवक – जावक पाहता या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गचे काम चालू आहे. परंतु येथे उड्डाणपूल बांधलेला नाही. तरी सदरील ठिकाणी जनतेची रहदारी पाहता ब्रिज होणे तो बांधावा. राष्ट्रीय महामार्गाला मंगळवेढा बायपास येथे बोराळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला पूल नसल्याने या रोडवरून येणाऱ्या लोकांना खूप मोठे वळण घेवून यावे लागते. त्यामुळे वेळ व दळणवळणाचे अंतर वाढत आहे. तसेच अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे. तरी माचणूर – राहाटेवाडी जोडणारा व मंगळवेढा बोराळे जोडणारा पूल बांधण्याचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!