पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासाठी अमेरिकेतून मदत

पंढरपूर दि. 28 :- उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे गरजू, गरीब कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांच्या उपचारासाठी सायकॉन कन्सल्टंटचे रमेश लोकरे आणि स्वाती यलमार (कन्सास, अमेरिका) तसेच एन.राचमले फांउडेशन (अमेरिका) यांच्या सौजन्याने बालरोग तज्ज्ञ डॉ.आरदवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व दोन पोर्टेबल व्हेंन्टिलेटर दिले आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्याकडे कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटर सुपुर्द करण्यात आले.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पंढरपूर तालुक्यातील तसेच मंगळवेढा सांगोला, माळशिरस, मोहोळ परिसरातील कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेतात. या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटरमुळे उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या उपचाराच्या सुविधेत भर पडली असून याचा उपयोग गरीब व गरजू रुग्णांना करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय डॉ.गिराम यांनी दिली. सायकॉन कन्सल्टंट व एन.राचमले फाऊंडेशन अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संस्था असून, या संस्थेमार्फत कोरोना कालावधीत अनेक रुग्णालयांना मदत केली आहे.
सदर मदत सुपुर्द करतेवेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, डॉ.भातलवंडे तसेच लातुरचे संजय आयचित उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!