उजनी @ 57.04 %, बडगार्डनचा विसर्ग वाढला

पंढरपूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणात आता उपयुक्त पाणीसाठा 57.04 टक्के झाला असून दौंडची आवक 5 हजार 681 असली तरी बंडगार्डनचा विसर्ग वाढत असल्याने आगामी काळात जलाशयातील आवक वाढेल.
खडकवासला धरणातून सकाळी 3 हजार क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने बंडगार्डनचा विसर्ग वाढला आहे. हेच पाणी पुढील काही तासात दौंडजवळून उजनीत येईल. दरम्यान भीमा नदीवरील चासकमान धरणातूनही दुपारी 1500 क्युसेक पाणी सोडले जात होते. अन्य काही प्रकल्पातून कमी प्रमाणात पाण्याचे विसर्ग सुरू आहेत.
उजनी धरण हळूहळू भरत असून यात आता एकूण 94.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर उपयुक्त पाणी हे 30.56 टीएमसी इतके आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!