चिंताजनक : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा पाचशेपार

पंढरपूर- सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( महापालिकाक्षेत्र वगळून) गुरूवार 29 जुलै रोजी कोरोनाबाधितांचा आकडा एकाच दिवशी 548 ने वाढला असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. मागील काही दिवसांपासून कमी होत चाललेली रूग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.
जिल्हा ग्रामीणमधील माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 123, यापाठोपाठ माढा 108, पंढरपूर 95, सांगोला 71 तर करमाळा 55 आणि मंगळवेढ्यात 32 रूग्णांची एकाच दिवशी नोंद आहे. आजच्या अहवालानुसार 9 हजार 816 चाचण्या घेण्यात आल्या असून यापैकी 9268 निगेटिव्ह आहेत तर 548 पॉझिटिव्ह आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 1 लाख 46 हजार 792 रूग्ण आढळून आले असून 3 हजार 114 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्या 3 हजार 489 जणांवर उपचार सुरू आहेत.
सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यात 28 हजार 338 इतके सापडले असून यापाठोपाठ माळशिरसमध्ये 27 हजार 617 जणांची नोंद आहे. गुरूवारी पंढरपूर शहरात 12 तर तालुक्यात 83 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या शहरातील 139 तर ग्रामीणमधील 426 जण असे एकूण 565 जणांवर उपचार सुरू आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!