अतिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा: पालकमंत्री

सोलापूर- पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिल्या.पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट, कोर्टी, केत्तुर -1, पारेवाडी व  कात्रज  या भागातील येथील नुकसानग्रस्त पीकांची पाहणी करुन शेतक-याच्या बांधावर जाऊन, संबंधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयंवतराव जगताप, तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी श्रीकांत खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री विजय देशमुख यांनी पीकांची पाहणी केल्यावर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन एकही शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचीत राहणार नाही अशी दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार समीर माने यांना दिल्या. तसेच विविध ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पहाणी केली तेथील  शेतकर्यांबरोबर चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शेतक-यांनी नुकसान झालेल्या शेतीबाबतची आवश्यक कागदपत्रे कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडे द्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले. यावेळी विविध गावातील शेतक-यांकडून पालकमंत्री विजय देशमुख यांनी निवेदने स्वीकारली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!