आवताडे व परिचारक एकत्र आल्याने भाजपाचा विजय निश्‍चित : बाळा भेगडे

पंढरपूर, – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आवताडे व परिचारक हे एकत्र आल्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होणार हे आजच जाहीर करीत असल्याचा विश्‍वास माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपाकडून आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समाधान आवताडे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पक्षाचा एबी अर्ज भेगडे यांनी त्यांना सुपूर्द केला. यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, प्रा.चांगदेव कांबळे, बादलसिंह ठाकूर, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भेगडे यांनी, राज्य सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याने सदर निवडणूक लढविण्याचा पक्षाने निर्णय घेतला असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांची वीज तोडणे, आश्‍वासनाचा विसर तसेच वाझे प्रकरणामुळे संपूर्ण देशात राज्याची झालेली बदनामी यामुळे आगामी निवडणुकीत जनतेचा कौल भाजपालाच राहणार असल्याचा दावा केला. तसेच मागील दोन निवडणुकीत विरोधात लढलेले आवताडे व परिचारक एकत्र आल्याने विजय आमचाच असा विश्‍वासही भेगडे यांनी व्यक्त केला.

तर समाधान आवताडे यांनी, मागील अकरा वर्षा पासून मतदार संघाचा विकास खुंटला होता. विकासाचा हा आलेख उंचविण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान समाधान आवताडे मंगळवारी सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार विनायक मेटे, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपिचंद पडळकर, श्रीकांत भारतीय, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

2 thoughts on “आवताडे व परिचारक एकत्र आल्याने भाजपाचा विजय निश्‍चित : बाळा भेगडे

  • March 17, 2023 at 12:08 am
    Permalink

    You made various nice points there. I did a search on the theme and found the majority of folks will have the same opinion with your blog.

  • March 17, 2023 at 1:50 am
    Permalink

    Thank you for some other great post. The place else may anybody get that kind of information in such an ideal method of writing? I’ve a presentation subsequent week, and I’m on the search for such information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!