उजनी दोन टक्के वधारली, 1 जून पासून 37 मि.मी. पावसाची नोंद

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणावर एक जून पासून 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून प्रकल्पातील पाण्यात दोन टक्के वाढ झाली आहे.
उजनी धरण 2 जून रोजी वजा 22.44 टक्के अशा अवस्थेत होते ते आता वजा 20.55 टक्के झाले आहे. धरण अद्यापही मृतसाठ्यात असून यंदा मे महिना संपेपर्यंत प्रकल्पाच्या मृतसाठ्यातील 22.44 टक्के पाण्याचा वापर झाला होता. मात्र मागील काही दिवसात जलाशयावर 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे दोन टक्के पाणीसाठ्यात वाढ दिसत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा 1491 दशलक्ष घनमीटर म्हणजे 52.65 टीएमसी इतका असून मृतसाठ्यातून धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी 11.01 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलाशयातील बाष्पीभवर ही मंदावले आहे. सध्या धरणातून कोणत्याही कारणास्तव पाणी सोडणे बंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!