एकूण कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 7932 संख्येसह पंढरपूर तालुका अव्वल

पंढरपूर – कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी खूपच कमी झाला होता मात्र आता पुन्हा काही तालुक्यात रूग्ण संख्या वाढताना दिसत असून यात पंढरपूर व माळशिरस तालुक्याचा प्रामुख्याने समावेश आहे. पंढरपूर तालुका एकूण आठ हजार रूग्णसंख्येच्या मार्गावर आहे तर माळशिरस तालुक्याने सात हजार संख्या पार केली आहे.
रविवारी 10 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात दोन तर तालुक्यात चौदा रूग्ण वाढले आहेत तर माळशिरस तालुक्यात 23 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुका हा रूग्णसंख्येत आघाडीवर आहे. येथील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 932 इतकी झाली आहे. या तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले असून ती संख्या 234 इतकी आहे. सध्या केवळ 123 रूग्ण उपचार घेत आहेत तर 7575 कोरोनाबाधितांनी उपचारानंतर या आजारावर मात केली आहे. पंढरपूरच्या ग्रामीण भागातच कोरोनाचा प्रसार जास्त असून येथे ग्रामीणमध्ये आजवर 4608 रूग्ण आढळून आले आहेत तर शहरात 3324 कोरोनाबाधित सापडले होते. शहरात 97 जणांनी तर ग्रामीणमध्ये 137 रूग्णांनी या आजारात प्राण गमावले आहेत. शहरातील 3174 तर तालुक्यातील 4401 जण या आजारातून बरे झाले आहेत.
पंढरपूर तालुका जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत क्रमांक एकवर आहे तर आता माळशिरस तालुका क्रमांक दोनवर आला आहे. येथील एकूण रूग्णसंख्या 7003 इतकी झाली आहे. या तालुकयात 156 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या केवळ 52 जणांवर उपचार सुरू असून 6795 जणांनी या आजारावर मात केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38592 इतकी झाली असून रविवारी 71 जणांनी भर पडली तर 75 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. जिल्हा ग्रामीणमध्ये आज 2 मृत्यूंची नोंद आहे तर आजवर 1140 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 480 जणांवर उपचार सुरू असून 36792 जणांनी या आजारावर मात केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!