दुधाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पंढरपूरमध्ये दूध बंद आंदोलन

आंबे येथे श्री दर्लिंग मंदिरात तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्याकडून दुग्धाभिषेक

तुंगतमध्ये आंदोलन

पंढरपूर – दुधाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तुंगत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. गायीच्या दुधाला प्रतिलीटर 25 ₹ दर व 5 ₹ प्रतिलीटर अनुदान देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. तुंगत गावांसह परिसरातील दूध संकलन बंद ठेवून उत्पादकांनी बंद मध्ये सहभाग घेतला. ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालून साकडे घातले.
यावेळी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे , सरपंच आगतराव रणदिवे , औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे , विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे , रामकृष्ण नागणे , आविराज रणदिवे , रमेश आद , गणेश रणदिवे , श्रीकांत आवताडे उपस्थित होते.


One thought on “दुधाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पंढरपूरमध्ये दूध बंद आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!