पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात 1 हजार 400 कोरोनाबाधित रुग्णांवर आजवर उपचार
पंढरपूर, दि. 09:- पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील तसेच परिसरातील 1 हजार 400 हून अधिक गरीब व गरजू रुग्णांना उपचार देण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयात 50 बेडचे कोविड हॉस्पिटलची क्षमता असतानाही 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. अपुरे मनुष्यबळ असताना देखील कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले. तसेच ऑक्सिजनची बचत करण्यासाठी ‘नॉन रिब्रीदिंग मास्क’चा प्रयोग प्रथमच करण्यात आला त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळण्याबरोबर ऑक्सिजनची बचतही मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या उपचारा बरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. तसेच आतापर्यत 7 हजार 990 जणांची कोविड आरटीपीसीआर चाचणी व 16 हजारहुन अधिक संशियत व्यक्तींची रॅपिड ॲटिंजेन चाचणी करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आहोरात्र उपचार केल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले.
.
https://tinyurl.com/2g32dov9
There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made
dizayn cheloveka telegram