पंढरीत खासगी लॅबमध्ये कोविड 19 च्या तपासणीची चाचपणी

पंढरपूर- शहरातील नागरिकांना कोविड 19 बाबतची रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी खासगी लॅबमध्येही आता करून घेणे शक्य होणार असून यासाठीची बैठक रविवारी नगरपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत झाली. यासाठी खासगी लॅबना मंजुरीसाठीचे प्रस्ताव सोलापूर सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवावे लागणार आहेत.
बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , नगरसेवक संजय निंबाळकर व खासगी लॅबचे डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी डॉ.एकनाथ बोधले यांनी त्यांच्याशी चर्चा केली. पंढरपूर शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अनेक नागरिक खासगी लॅबमध्ये ही तपासणी करू इच्छित आहेत. त्यामुळे शासनाच्या गाईडलाइननुसार शहरात 5 खासगी लॅबधारकांना तपासणी सेवा देता येवू शकते. या पॅथॉलॉजी लॅबनी याबाबतचे प्रस्ताव सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवायचे आहेत. यानंतर यास मंजुरी मिळू शकते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांतर परिचारक यांनी सांगितले की, पंढरपूर शहर व तालुक्यासह आजुबाजूच्या मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यातील नागरिकांना सुद्धा ही कोविड 19 ची तपासणी सेवा यामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्यांना हे काम करायची आहे त्यांनी आपल्या लॅबचे प्रस्ताव पाठवावेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!