महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी राकेश टोळ्ये यांची निवड

पुणे – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून दैनिक सुराज्यचे संपादक जेष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये यांची एकमताने निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्याची बैठक पुण्यातील कर्वे रोडवरील संघाच्या सभागृहात बोलावण्यात आली होती. या बैठकीस राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, वृत्तवाहिनी अध्यक्ष रणधीर कांबळे, वृत्तवाहिनी ग्रामीण अध्यक्ष मनीष केत, उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये नूतन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. याच बरोबर प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सोलापुरातील सुराज्यचे संपादक जेष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार सुरक्षा कायदा, घरकुल, पेन्शन यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत या बैठकीत विचार मंथन करण्यात आले. या बैठकीस राज्यभरातून सुमारे 100 हुन अधिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!