सावधान.. कोरोना पुन्हा पाय पसरतोय..! मंगळवारी सोलापूर शहरात 49 तर ग्रामीणमध्ये 93 रूग्ण आढळले , जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

पंढरपूर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचे चित्र असून सोलापूर शहरात मंगळवारी 9 मार्च रोजी 49 नवीन रूग्ण आढळून आले आहेत तर जिल्हा ग्रामीणमध्ये 93 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. आज सोलापूर शहरात 3 तर ग्रामीणमध्ये एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी सर्वाधिक रूग्ण करमाळा तालुक्यात 24 तर यापाठोपाठ माढा व बार्शीत प्रत्येकी 17 ,माळशिरस तालुक्यात 11 तर पंढरपूरमध्ये 9 जणांची नोंद आहे. मोहोळ तालुक्यात 7 रूग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शहर व ग्रामीण भागातील रोजचा आकडा आता शंभरीपार आहे. मंगळवारी 142 रूग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 113 रूग्ण आढळून आले असून 1194 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 617 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 302 जण या आजारातून ब झाले आहेत. आज ग्रामीणमध्ये 48 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
सोलापूर शहरात आज 49 रूग्ण सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रूग्णसंख्या 12 हजार 755 इतकी झाली असून 669 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 462 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 11624 जण ब होवून घरी गेले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले असून मंगळवारी शहरात चार तर ग्रामीणमध्ये पाच जणांनी नोंद आहे. आजवर या तालुक्यात 8275 रूग्ण आढळून आले असून 243 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 77 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

One thought on “सावधान.. कोरोना पुन्हा पाय पसरतोय..! मंगळवारी सोलापूर शहरात 49 तर ग्रामीणमध्ये 93 रूग्ण आढळले , जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

  • March 17, 2023 at 7:11 am
    Permalink

    I’ve been surfing online more than 3 hours today, yet I never found any interesting article like yours. It’s pretty worth enough for me. Personally, if all website owners and bloggers made good content as you did, the net will be much more useful than ever before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!