मी काहीही लपविलेले नाही.. तीन तीन कोरोना चाचण्या निगेटिव्ह आहेत..गैरसमज नको : आ. परिचारक

मुंबई – विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे कोरोनाचे दोन वेगवेगळे अहवाल असल्याचा मुद्दा मंगळवारी सभागृहात गाजला. यावर दुपारी स्पष्टीकरण देताना आ. परिचारक म्हणाले,अधिवेशनाच्या पूर्वी मी पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात २६ फेब्रुवारीला स्वँब तपासणीसाठी दिला होता. याचा अहवाल २८ रोजी पाँझिटिव्ह आल्याने मी विलगीकरणात गेलो. यांनतर माझा मुलगा जो एमडी (डॉक्टर)आहे त्याने rapid टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोन वेळा चाचणी केली ती निगेटिव्ह आली. या काळात आपण कारखान्यावर विलगीकरणात राहिलो. यानंतर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी पुण्यात केली. तिही निगेटिव्ह आली. या दरम्यान डॉ. दाते यांना सर्व बाबी सांगितल्या. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार ५% चाचण्यांचे निकाल चुकू शकतात. तीन वेळा चाचण्या करून अधिवेशनाला आलो.याबाबत सभापतींना माहिती दिली. आज ज्या आमदार शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना ही माझ्या या चाचण्यांबाबत बोललो होतो. काल पुन्हा मी चाचणी केली आहे.. ती पण निगेटिव्ह आहे.
वास्तविक पाहता मीच शासकीय यंत्रणेबाबत या चाचण्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करायला हवा होता. मात्र त्यात त्यांची काय चूक..काहीवेळा फाँल्स पाँझिटिव्ह…फाँल्स निगेटिव्ह होवू शकते याची कल्पना आहे. मी काहीही लपविलेले नाही. हे माझे चाचणी अहवाल पटलावर ठेवायला तयार आहे. यामुळे कोणाचाही गैरसमज नसावा.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!