सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शनिवारी 663 रुग्ण वाढले, एकूण संख्या 16738
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) शनिवारी 12 सप्टेंबर रोजी एकूण 663 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 190 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 306 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 13 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16738 इतकी झाली असून यापैकी 10803 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5454 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 306 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 481 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 13 जण मयत आहेत.
Your article has answered the question I was wondering about! I would like to write a thesis on this subject, but I would like you to give your opinion once 😀 baccaratsite