सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सोमवारी 31 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर, दि.29- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) सोमवार 29 जून रोजी आणखी 31 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 344 इतकी झाली असून यापैकी 130 जण उपचार घेवून घरी परतले आहेत तर 197 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी एकूण 112 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 81 निगेटिव्ह आले तर 31 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 29 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 3673 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 3644 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 343 आहेत तर 3301 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी जे 31 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत यात दक्षिण सोलापूर 27, उत्तर सोलापूर 1, अक्कलकोट 1, बार्शी तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.
आज सापडलेल्या रूग्णात उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील 1. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव 6, बोळकवठा 1, होटगी स्टेशन 1, वांगी 8, हात्तुर 7, बोरामणी 1, कुंभारी 3. बार्शी तालुक्यातील घाणेगाव 1, वैराग 1. तर अक्कलकोट शहरातील एक जणाचा समावेश आहे.
आजवर कोरोनाचे सापडलेले तालुकानिहाय एकूण रूग्ण- दक्षिण सोलापूर 159, अक्कलकोट 67, बार्शी 51, उत्तर सोलापूर 24, मोहोळ 17, माढा 8, पंढरपूर 9, माळशिरस 5, सांगोला 3, करमाळा 1.
उपचार सुरू असलेले तालुकानिहाय रूग्ण- द.सोलापूर 96, अक्कलकोट 47, बार्शी 26, मोहोळ 13, उ. सोलापूर 11, ,पंढरपूर 2, माढा, करमाळा प्रत्येकी 1.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!