हृदयद्रावक घटना :मातेने छोट्याशा बालिकेसह जीवन संपवले..कारण .. किरकोळ घरगुती वाद!

सोलापूर- घरगुती किरकोळ वादातून एका मातेने आपल्या लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे घडली.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे राचम्मा संतोष पटणे (वय 26, रा. होटगी, ता. द. सोलापूर) व चैत्रा संतोष पटणे (वय6) अशी आहेत. याची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी घरामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर राचम्मा या कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु त्या सापडल्या नाहीत. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास होटगी शिवारातील अशोक चव्हाण यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यावर दोघी तरंगत असताना आढळून आल्या. या घटनेची माहिती वळसंग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी माय- लेकीला पाण्यातून बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु दोघींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. माय-लेकीच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वळसंग पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास हवालदार गुरव व पोलीस नाईक यादव हे करीत आहेत. घरात झालेल्या किरकोळ वादातून महिलेने मुलीसह आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!