मंगळवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 138 रुग्ण वाढले , एकूण संख्या 31404

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी एकूण 138 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 53 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 105 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31404 इतकी झाली असून यापैकी 28733 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1739 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 105 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 932 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 53 रूग्ण वाढले

पंढरपूर- मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 9 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 44 असे 53 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 242 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 188 झाली आहे.एकूण 472 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5582 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!