राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी १७.५ दिवसांवर, आतापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडले

राज्यात कोरोनाच्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.३०: राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खासगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.
राज्यात ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!