सहकार शिरोमणीसह जिल्ह्यातील 6 सहकारी साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा, शासनाची हमी

पंढरपूर- राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने 516.30 कोटी रू. शासन हमी दिली असून यात सोलापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सहा कारखान्यांना 120 कोटी ₹ हमी देण्यात आली आहे.
यात गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी 30.96 कोटी, दामाजी मंगळवेढा 10.58, सहकार महर्षी अकलूज 33.24 , कुर्मदास माढा 5.15, भीमा मोहोळ 20.22, सहकार शिरोमणी भाळवणी पंढरपूर 14. 52 कोटी ₹ या साखर कारखान्यांचा समावेश आहे. 2020- 21 च्या गळीत हंगामात हे कारखाने आता सुरू होवू शकतात.
हंगाम 15 आँक्टोंबर रोजी सुरू होणार आहे. तत्पूर्वी शासनाने थकहामी दिली आहे. यामुळे कारखाने सुरू करण्यास आता अडचण नाही. शेतकरी संघटना थकीत बिलांसाठी आंदोलन करत आहेत. आज थकहामी दिलेल्या कारखान्यात भाजपा नेत्यांचे कारखाने आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!