सोमवारी पंढरपूर तालुक्यात केवळ दोन कोरोना रूग्णांची नोंद, एकूण संख्या 7606

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत आघाडीवर असणार्‍या पंढरपूर तालुक्यात सोमवार 14 डिसेंबर रोजी केवळ दोन रूग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजार 606 इतका झाला आहे. तर सध्या 187 रूग्ण येथे उपचार घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी 57 रूग्ण आढळून आले असून 123 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. आजच्या अहवालानुसार चारजणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. पंढरपूर तालुका कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत अगे्रसर राहिला आहे. सोमवारी तालुक्याच्या ग्रामीण भागात दोन रूग्ण आढळून आले आहेत तर शहरात एकाही रूग्णांची नोंद नाही. तालुक्यात ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांची संख्या 4386 इतकी आहे तर शहरात आजवर 3220 ची नोंद आहे. आजवर शहरात 96 जणांनी तर ग्रामीणमध्ये 129 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या शहरातील 56 तर ग्रामीमधील 131 जणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात 7194 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!