सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी 337 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी एकूण 337 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 71 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 184 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14522 इतकी झाली असून यापैकी 9683 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4420 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 184 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 419 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 8 जण मयत आहेत.
मंगळवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 0, बार्शी 63, करमाळा 43, माढा 28 , माळशिरस 68, मंगळवेढा 23, मोहोळ 2, उत्तर सोलापूर 4, पंढरपूर 71, सांगोला 29, तर दक्षिण सोलापूर 6.