ग्रामीणमध्ये कोरोना रूग्ण संख्या वाढतेय, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये,! अचानक आरोग्य केंद्राची मोबाईल बॅटरी प्रकाशात पाहणी

पंढरपूर,दि.- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत असून माळशिरस, पंढरपूर , माढा हे तालुके पुन्हा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अचानक आरोग्य केंद्रांचे दारे सुरू केले असून गुरूवारी रात्री त्यांनी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तेथील माहिती तर घेतलीच पण तेथील त्रुटी जाणून घेवून तातडीने वरिष्ठांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी ्र आरोग्य अधिकार्‍यांच्या कक्षातील बल्ब गेला असल्याने वीज नव्हती मात्र अशात ही जिल्हाधिकारी यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात तेथील माहिती घेतली. या केंद्रात जिल्हाधिकार्‍यांना आढळून आलेल्या त्रुटीबाबतचा खुलासा तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या या अचानक पहाणी दौर्‍याने पंचायत समिती आणि महसूल प्रशासनास धावपळ करावी लागली.
जिल्हा ग्रामीणमधील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने तसेच महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तालुकानिहाय बैठका घेवून सूचना केल्या असल्या तरी संख्या आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. काहीच तालुके हॉटस्पॉट बनत आहेत. याच धर्तीवर जिल्हाधिकारी यांनी आता कडक भूमिका घेत प्रत्यक्ष जागेवर जावूनच माहिती घेणे सुरू केल्याचे दिसत आहे.
माढा ग्रामीण रुग्णालय आणि उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना टेस्टिंग आणि उपचार व्यवस्थेची पहाणी श्री. शंभरकर यांनी केली. या अचानक भेटीची महसूल प्रशासनास कोणतीच कल्पना नव्हती. जिल्हाधिकारी उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार तेथे पोहोचले.
जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद व्हनकळस यांचेकडून कोविड आणि नॉन कोविड रूग्ण्याच्या संदर्भात माहिती घेतली. कोरोना चाचण्या किती होतात याची चौकशी केली तसेच चाचण्यांचे प्रमाण कमी का? अशी विचारणा केली. ग्रामीण रुग्णालयात येणार्‍यांची चाचणी केली जाते, फिल्डवर जावून होत नाही व हे काम प्राथमिक आरोग्य केंद्र करते अशी माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी थेट उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले आणि येथील परिस्थितीची पाहाणी केली तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांच्याकडून माहिती घेतली. येथील बहुतांश कर्मचारी मुख्यालयात राहात नाहीत ही गोष्ट समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना बोलावून घेऊन याबाबतीत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर रूग्णवाहिकेबाबतही विचारणा केली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपळाई प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कक्षातील विजेचा बल्ब गेलेला असल्याने तेथे अंधार होता . अशात ही त्यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!