सर्वपक्षीय पंढरपूरकरांनी पाठविली सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत

पंढरपूर- सांगली व कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेकांनी स्वयंस्फूर्तीने मदत केली असून ती शुक्रवारी पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली.
नुकताच सांगली व कोल्हापूर या भागाला महापूराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत. त्या पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. यास मोठा प्रतिसाद देत शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. ती मदत आज पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर व आपला एक महिन्याचा पगार देणारे पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांच्या हस्ते साहित्याचे पूजन करून सांगली ,कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे, पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूणभाऊ कोळी, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सूर्यकांत दाजी बागल, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, रणजित बागल, पंढरपूर नगरपरिषदेचे महम्मद उस्ताद, धनाजी पाटील, संतोष बंडगर, दादा थिटे, सूरज पावले, विनायक संगीतराव, गणेश परचंडे, युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर, प्रशांत मलपे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रणव गायकवाड, शिवसेनेचे तानाजी मोरे, सचिन आटकळे, शहाजहान शेख, नानासाहेब चव्हाण, नवनाथ मोहिते, बाहुबली साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांनी दिली मदत
डॉ.बी.पी.रोंगे , उमेश सासवडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे, स्वागत कदम, महम्मद उस्ताद, गणेश परचंडे, राजू शिंदे, डॉ.भायगुडे, प्रशांत खलिपे, मंगळवेढा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संदीप बुरकुल, अरूणभाऊ कोळी या व काही दानशूर व्यक्तींनी नांव न सांगण्याच्या अटीवर पुरग्रस्तांना मोठी मदत केलेली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!