वाखरी- कौठाळी – गुरसाळे बाह्यवळण रस्ता पंढरपूरच्या विकासात भर टाकेल : प्रांताधिकारी सचिन ढोले

पंढरपूर : – वाखरी – गुरसाळे – कौठाळी या भागातील बाह्यवळणाचे काम लवकरच सुरु केले जाईल . हा प्रकल्प पंढरपूरच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये भरभराट टाकणारा असल्याचे मत प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले .
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ मोहोळ -पंढरपूर – आळंदी मधील पंढरपूर बाह्यवळणाचे काम प्रगतिपथावर असून, पंढरपूर बाह्यवळण हा देगाव, आढीव, गुरसाळे, शिरढोण, कौठाळी आणि वाखरी या मार्गे राष्ट्रीय महामार्गाला एम. आय.टी महाविद्यायलाजवळ जोडला जात आहे . बाह्यवळणाचे काम अगदी प्रगतिपथावर असून आज मौजे शिरढोण येथे सक्षम प्राधिकारी तथा भुसंपादन अधिकारी सचिन ढोले यांनी प्रकल्पाला भेट दिली .
यावेळी प्राजेक्ट डायरेक्टर केशव घोडके , जे. एम. म्हात्रे. इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर अरुण म्हात्रे, जनरल मॅनेंजर विजय कुमार , ककाणे , एस. एम. अवताडे कंपनीचे जनरल मॅनेंजर सौरभ पवार तसेच पॅकेज 2 चे मॅनेंजर शुभम जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते पंढरपूर बायपास बाह्यवळणाचे मौजे शिरढोण या गावी चेनेज क्रमांक ४०-१०० ते ४२-२०० या डांबरीकरणाच्या पट्टयाचे काम सुरु करण्यात आले . या डांबरीकरणाच्या पट्टयाचे सक्षम प्राधिकारी तथा भुसंपादन अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले . जे. एम. म्हात्रे. इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीचे जनरल मॅनेंजर दिपकसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला .
यावेळी ढोले म्हणाले , पालखी मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी किंवा नागरीकांच्या घरे , जागा गेल्या आहेत त्यांना त्यांच्या नुकसानीचा ९० टक्के मोबदला वाटप करण्यात आला आहे . बाह्यवळणाचे विस्तारीकरणांचे काम करीत असताना बाधित शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे बाह्यवळणामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन , फळझाडे , वनझाडे आणि बांधकाम अशा प्रकारे सर्व बाबींचा मोबदला लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल . त्याचबरोबर इतर गांवांतील वाखरी, गुरसाळे आणि कौठाळी या भागातील बाह्यवळणाचे काम लवकरच चालू करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले . पंढरपूरच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये भरभराट टाकणारा हा बाह्यवळण प्रकल्प असल्याचे ते म्हणाले .
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!