उजनीच्या पाण्यापासून पंढरपूर व मंगळवेढा लाभक्षेत्रातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची आमदार आवताडेंची सूचना
पंढरपूर – उजनी लाभक्षेत्रातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील एकही शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाने आपली यंत्रणा सज्ज करावी व त्यासाठी आवश्यक ती मदत लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर असेन, अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी या विभागाच्या अधिकार्यांना दिली. येथे बुधवारी बैठक घेण्यात आली
कालव्यात पाणी प्रवाहासाठी अडथळा निर्माण करणारी झाडे- झुडपे काढणे, कॅनॉलच्या शेजारील रस्ते दुरुस्ती या विषयांवर चर्चा झाली. यावेळी पाणी मागणी फॉमर्र्मधील विहिरीबाबतच्या एका अटीवर आमदार आवताडे यांनी अधिकार्यांकडे विचारणार केली. या अर्जातील अट अशी आहे की, सिंचित प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये विहिरीवर सिंचन होणार्या शेतीस कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी लागत नसल्याने हे क्षेत्र लाभक्षेत्रांमधून वगळण्यास हरकत नाही, असे लिहून घेतले जात आहे. ही अट त्या अर्जामधून वगळण्याच्या विषयावर यावेळी विचारमंथन झाले.