पंढरपूर – धाराशिव साखर कारखाना युनिट 1,2,3 चे अध्यक्ष अभिजित धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान , नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबि, अन्नदान, गरजू लोकांना किराणा किट वाटप, वृक्षारोपण, कोविड योद्धाचा सन्मान अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात येणार आहे.
पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते अभिजित पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोविडच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांनी देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प धाराशिव कारखान्यात उभा केला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे. डिव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर भागात मोठे काम उभे केले आहे. तर उस्मानाबाद, नांदेड, नाशिक सारख्या जिल्ह्यात जावून साखर कारखाने चालवून योग्य दर दिला आहे.
कोविड काळात त्यांनी सुरूवातीला पंढरपूर तालुक्यात आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतला होता. दुसर्या लाटेत त्यांनी डिव्हीपीमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करून येथील रूग्णांना दिलासा दिला आहे.
1ऑगस्ट रोजी पाटील यांचा वाढदिवस असून शहर व तालुक्यात विविध ठिकाणी विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.