संचारबंदीबाबत आमदार समाधान आवताडे जनतेच्या पाठीशी ; उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

पंढरपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच दुदैवाने पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदीचा आदेश काढण्यात आला आहे

हा आदेश जाहीर झाल्यानंतर पंढरपूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधानदादा आवताडे यांना संचारबंदीमुळे होणाऱ्या नुकसानाची वस्तुस्तिथी मांडली. आवताडे यांनीही पंढरपूर येथे शहर व्यापाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहून व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व आपल्या भावना शासनदरबारी मांडण्याचे अभिवचन दिले.

त्या अनुषंगाने आ. समाधान आवताडे यांनी आ. प्रशांत परिचारक यांचे समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर संचारबंदी शिथिलता व मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात सखोल चर्चा केली.

राज्यात ईतर जिल्ह्यात ज्याप्रमाणे संचारबंदी नियम शिथिलता दिली गेलेली आहे. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्याचाही प्राधान्यक्रमाने विचार करून मायक्रो निरीक्षण या प्रणालीनुसार जिथे रुग्णसंख्या अधिक आहे अशा ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करावा अशी विनंतीही यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केली.

त्याचबरोबर येत्या १३ तारखेपासून जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, करमाळा, मंगळवेढा आणि बार्शी या तालुक्यात संचारबंदी करण्याचे आदेश काढले आहेत. सदर संचारबंदीस पंढरपूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे त्यास अनुसरून काल घंटा नाद व आज अर्धनग्न आंदोलन केलेले आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिक यांच्या भावना लक्षात घेऊन याचाही पुनर्विचार करण्यासंबधी जिल्हा प्रशासनास आदेशीत करावे अशीही मागणी आ.समाधान आवताडे यांनी केली आहे.

आ.आवताडे यांनी मतदारसंघातील धोरणात्मक विकासासाठी अभ्यासु कौशल्यांनी केलेल्या विविध मागण्या आणि व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची मांडलेली बाजू याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. आवताडे यांनी लवकरच शिथिलते बाबत ठाम निर्माण घेवू असे सांगितले.

याचवेळी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत आणि मूलभूत विकासासंदर्भात आ. समाधान आवताडे यांनी नगरविकास मंत्री यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार रणजितसिंह मोहीते – पाटील,आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!