भीमा व घोड उपखोरे परिसरात पावसाची हजेरी

पंढरपूर – घोड व भीमा उपखोरे परिसरात मागील चोवीस तासात अनेक धरणांवर पावसाने हजेरी लावली आहे. पुणे भागात होत असलेल्या पावसाने बंडगार्डन चा विसर्ग 4300 क्युसेक झाला आहे. उजनीत दौंडजवळून 4 हजार क्युसेक पाणी मिसळत आहे.
नीरा नदीवरील वीर प्रकल्पावर 23 मि.मी. पावसाची नोंद आहे. मागील काही दिवस पावसाने दडी मारली होती. यामुळे चिंतेचे वातावरण होते.
उजनी धरण ६१ % भरले आहे. यात ९६.३६ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!