पंढरपूर तालुक्यात पावसाचे पुनगरागमन, चळे मंडलात 31 मि.मी.ची नोंद
पंढरपूर- गेले अनेक दिवस दमदार पावसाने पंढरपूर व परिसरात दडी मारली होती, माता शुक्रवारी रात्री त्याचे पुनरागमन झाले असून काल सर्वाधिक पर्जन्याची नोंद ही चळे मंडलामध्ये 31 मिलीमीटर इतकी झाली आहे.
शनिवार 21 ऑगस्ट सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तालुक्यात एकूण 101 मि.मी. पावसाची नोंद आहे. यात करकंग 7, पटवर्धन कुरोली 6, भंडीशेगाव 10, कासेगाव 9, पंढरपूर 23, तुंगत 4, चळे 31 तर पुळूज मंडलामध्य 11 मि.मी. पावसाची नोंद आहे.
जून व जुलै महिन्यात पंढरपूर भागात चांगला पाऊस झाला होता. मात्र त्याने ऐन श्रावणात ओढ दिली होती. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक तर शुक्रवारी पंढरपूर, चळे परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.